'मिस्टर क्लीन', महाराष्ट्राला विश्वास द्या!
निर्णय त्वरित घेण्याची क्षमता, त्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्धार आणि त्यावरून निर्माण होणार्या संघर्षाचा सामना करण्याची तयारी, असे स्वभावगुण असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वतरुळात तर्कविर्तकांना चांगलेच उधाण आले आहे.