संमतीचं सोळावं.. मोक्याचं की धोक्याचं?
भारतीय संस्कृतीमध्ये सोळावं वरीस धोक्याचं असे सर्रास मानले जाते. या वयात मुलींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे याकरिता पालकांकडून आणि घरातील वडीलधार्यांकडून विशेष काळजी घेतली जाते. घरातली, नात्यागोत्याची, आजूबाजूची वडीलधारी मंडळी जास्त शिकलेली नसली, अशिक्षित असली अथवा आधुनिक विचारांची नसली तरी कुटुंब व्यवस्था चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवण्यासाठी लागणारे शहाणपण त्यांच्या ठायी निश्चितपणे असते.

