आकाश फाटलंय, ठिगळं कुठे लावणार?
कोणत्याही नेत्यावर आरोप
झाले की राजकारणातल्या शहकाटशहाचा हा परिणाम असल्याचे निगरगट्टपणे सांगितले
जाते; परंतु समाजहितासाठी, लोकांच्या करांमधून जमा झालेला सरकारी पैसा हडप
करून तो स्वत:च्या लॉकरमध्ये ठेवायचा. पत्नी, मुलांच्या, नातेवाइकांच्या
नावावर ठेवायचा. दागदागिने, जमीनजुमल्यात गुंतवायचा. अशा भ्रष्टाचार्यांना
कठोर शासन करण्याची भूमिका घेण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार
होतो, तेव्हाच धूर निघतो आणि कुठेतरी आग असल्याचा संशय
वाढतो.

