एक तुतारी द्या मज आणूनि..
लोकसभा निवडणुकीचे वारे
वाहू लागले आणि वेगवेगळय़ा राजकीय पक्षांत तुतार्या वाजू लागल्या. प्रत्येक
राजकीय पक्षात तुतारी वाजवण्याची चढाओढ चालू झाली 'एक तुतारी मज आणूनि,
फुंकीन जी मी स्वप्राणाने..' या केशवसुतांच्या कवितेच्या पंक्तींची आठवण
व्हावी असा प्रकार प्रत्येक पक्षात सुरू झाला आहे. कधी स्वबळावर लढण्याची
भाषा तर कधी आघाडी आणि युतीची भाषा कधी तुतारीचे संवादी सूर तर कधी
विसंवादी कधी दोन विरोधी राजकीय पक्षांच्या तुतार्यांचे विसंवादी दूर तर
कधी एकाच पक्षात असूनही विसंवादी सुरांच्या तुतार्या. गंमत म्हणजे
प्रत्येकाला वाटते बाजी मीच मारणार कुस्तीगिराने शड्ड ठोकताना पूर्ण ताकद
पणाला लावावी; पण कधी शड्ड ठोकण्यासाठी उतरले आणि दवाखान्यात दाखल झाले अशी
परिस्थिती उद्भवू शकते. मात्र सध्या तरी प्राणपणाने तुतार्या
फुंकण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत.


