विधानसभा निवडणुकीवर हिंसाचाराचे सावट
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली असल्यामुळे
राजकीय पक्षांमध्ये मोर्चेबांधणी होत असतानाच आंदोलनेदेखील तीव्र होऊ लागली
आहेत. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कायदा हातात घेण्यापर्यंत
आंदोलकांची मजल गेली आहे.


