नेत्यांनी केली आंबेडकरी चळवळीची वाताहत
यंदाची विधानसभा निवडणूक
म्हणजे जनतेच्या मनोरंजनाचा मोठा धमाका असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक
मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची संख्या पाहता बहुरंगी लढतींनी
चांगलीच रंगत येणार आहे. कोण नंबर एक आणि कोण नंबर दोन याचे आडाखे बांधले
जात आहेत. निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे आकडे पाहिले, तर गोंधळाची परिस्थिती
दिसून येत आहे. युती आणि आघाडी यांची फाटाफूट झाल्यामुळे तेही गोंधळलेले
आहेत. यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाच्या पक्षाचा जो गोंधळ झाला,
त्याचीही भर पडली.

