सत्तापरिवर्तन...काँग्रेसचे पतन!
महाराष्ट्राच्या
राजकारणावर असलेली कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पकड ढिली होऊन हे दोन्ही
पक्ष पराभवाच्या गर्तेत लोटले गेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या
स्थापनेपासून शिवसेना-भाजपा युतीचे साडेचार वर्षांचे विरोधी पक्षाचे सरकार
वगळता राज्यावर कायम कॉँग्रेसचेच वर्चस्व राहिले. परंतु गेल्या १५
वर्षांच्या आघाडीच्या कालखंडात मंत्र्यांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपाने
सरकारची बदनामी होत राहिली.

