मोदींच्या सत्ताकारणाने होतेय भाजपची अडचण
भारतीय जनता पक्ष व
शिवसेनेचे अखेर जमले, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, याचा प्रत्यय
महाराष्ट्राने घेतला खरा. शेवटी महाराष्ट्राच्या हितासाठी जनमताचा आदर
करण्यासाठी आम्हाला एकत्र यावे लागले, अशी गुळगुळीत वक्तव्ये सुरू झाली
त्याच वेळी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी खात्री पटली. मलईदार
खात्यांसाठी ताणलेले संबंध सैल झाले.


