बुवा तेथे राजकारणी
धर्मसंस्थेने समाजव्यवस्थेवर अतिक्रमण केल्यामुळे या देशातील सामाजिक पर्यावरणावर विपरित परिणाम झाला़धर्माच्या ठेकेदारांनी जातव्यवस्था आणि त्याचबरोबर माणसामाणसांमध्ये विषमतेची बिजे घट्ट रोवली़ अत्याधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि समानतेसाठी अथक प्रयत्न करणाºया पुरोगामी नेत्यांमुळे वातावरण बदलत असताना दुसरीकडे धर्माचा प्रभाव वाढवण्याचेही काम होत राहिले़ इतकेच नव्हे तर या देशाने स्वातंत्र्यानंतर जात, धर्म, पंथ, लिंग, भेदविरहित समानतेवर आधारलेली लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारली, तरी देखील धर्म आणि जातीचा राजकारणासाठी पुरेपूर वापर करून घेतला जात आहे़ देशातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा अजेंडा लपून राहिलेला नाही़ दुसरा प्रमुख राजकीय पक्ष व सर्वाधिक वर्षे सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्षही वेगळा नाही़ या पक्षानेही मतांच्या राजकारणासाठी जातीधर्माला महत्त्व दिले आहे़ भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे झुगारून देत धर्म व जातीय राजकारणच प्रभावी ठरत आहे़ अर्थात सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी जातीधर्माचा वापर केला जात आहे़
Read more...