Wednesday, April 4, 2012

साधेपणाचा सत्कार


आदराने एखाद्यासमोर नतमस्तक व्हावे, अशी व्यक्तिमत्त्वे आजच्या राजकारणात पाहायला मिळत नाहीत.

आदराने एखाद्यासमोर नतमस्तक व्हावेअशी व्यक्तिमत्त्वे आजच्या राजकारणात पाहायला मिळत नाहीतभ्रष्टाचार आणि घोटाळे करणारेच राजकारणी असले पाहिजेत अशी राजकारण्यांची ओळख बनत चालली आहेराजकारणाचा दर्जा घसरत चालला आहेअशा वातावरणात गणपतराव देशमुखांसारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आजही विधिमंडळात आहेयाचा सार्थ अभिमान महाराष्ट्रातील जनतेला निश्चितपणे आहे50 वर्षे अखंडपणे एकाच सांगोला या मतदारसंघातून निवडून येऊन अत्यंत साधेपणा जपत जनतेचे प्रश्न तळमळीने सोडवण्यासाठी अव्याहत झटणारे गणपतराव देशमुख हे असे आदरणीय व्यक्तिमत्त्व विधानसभेत आहेहा महाराष्ट्राचा गौरव आहे असेच म्हणावे लागेलआज तत्त्वनिष्ठ आणि सत्त्वनिष्ठ राजकारण राहिलेले नाहीराजकारण व्यक्तिकेंद्री होत चालले असून राजकारणात आयाराम गयाराम प्रवृत्ती वाढत चालली आहेअशा परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षावर असलेली निष्ठा कायम ठेवून राजकरणात टिकून राहणे आणि सलग दहा वेळा निवडून येणे अत्यंत कठीण आहेपण गणपतरावांनी केवळ कामावर भर देऊन अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली आहेअशा या साध्या सरळ व्यक्तिमत्त्वाचा सत्कार मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाने केला.

महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना भाजप युती या प्रमुख पक्षांना जनाधार मिळाला असून तिसरी आघाडी अथवा धर्मनिरपेक्षतावादी लहान पक्षांना लोकांचा प्रतिसाद मिळेनासा झाला आहेया पक्षांचे अस्तित्व तरी राहील की नाही अशी स्थिती आहे.राजकारणाची दिशा बदलली असून राष्ट्रीय पक्ष मागे पडत चालले आहेतप्रादेशिक पक्ष वाढत आहेतअसे चित्र बदलले असतानाही गणपतराव शेतकरी कामगार पक्षातर्फे निवडून येत आहेतज्यांचा आदर्श डोळय़ांसमोर ठेऊन गणपतराव शेकापमध्ये आलेते तुलसीदास जाधव यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलामात्र गणपतराव आपल्या विचारांपासून विचलित झाले नाहीत.विधानसभेत उपस्थिती कमी असल्याबाबतच्या वारंवार तक्रारी येतातनवीन सभागृहात आलेले आमदारही विधिमंडळांच्या कामकाजात फारसे गांभीर्याने सहभागी होताना दिसत नाहीतमात्र या वयातही गणपतराव सभागृहात जास्तीत जास्त काळ उपस्थित राहातातएखाद्या विषयावर काही वाद निर्माण झालातर त्याचा निर्णय कसा व्हावा याचे 50 वर्षाचे दाखलेच ते देतात

केवळ लोकहिताच्या प्रश्नांवरच तळमळीने बोलत असल्यानेच ते जेव्हा सभागृहात उभे राहाततेव्हा इतर सर्व सदस्य आदराने त्यांचे सर्व बोलणे जिवाचे कान करून ऐकतातविधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटीलही त्यांना संधी देतातहे त्यांनीच आजच्या सत्काराच्या वेळी बोलताना सांगितलेगणपतरावांनी हात वर केला म्हणजे ते नक्कीच सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न मांडतील याची खात्री असतेते खरेही ठरतेत्यांचा आदर्श आमच्यासारख्या तरुणांसमोर कायम राहीलअसेही ते म्हणालेज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही गणपतरावांच्या कार्याचा गौरव करताना राजकारणात अनेक प्रवाह आलेमात्र गणपतराव आपल्या विचारांवर अढळ राहिलेअसे सांगितलेएका ऋषितुल्य व्यक्तिचा गौरव होत असल्याची भावना सर्वच उपस्थितांच्या चेह-यावर होती.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP