मॅच फिक्सिंगने केली साधनशूचितेची ऐसीतैशी..!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला खरा; पण हा आवाज बुलंद नसून दबका असल्याचीच प्रतिक्रिया सर्वत्र उमटली. फडणवीस यांच्याबरोबर नेमके किती आमदार आहेत, त्यांना बहुमत आहे की नाही यापेक्षा राष्ट्रवादी कॉँग्रेसने विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आवाजी मतदानात सहभाग घेतला की नाही, ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा प्रय▪भाजप का करत आहे, याचीच चर्चा रंगू लागली आहे.


