Friday, June 29, 2012

इटलीतील फुटबॉल फिव्हर


क्रिकेट विश्वचषक सामन्यातील अंतिम फेरीत अखेरच्या निर्णायक चेंडूवर कोणाचा विजय होणार याचा फैसला होताना जो थरार निर्माण झालेला असतो. तसाच थरार युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण इटलीमध्ये अनुभवता आला.

क्रिकेट सामन्याच्या अंतिम फेरीत कोणतेही दोन संघ मैदानात उतरले तर क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचलेली असते. त्यातच हा सामना जर भारत पाकिस्तान यांच्यात असेल तर उत्सुकता इतकी ताणलेली असते की लाखोंच्या संख्येने मैदानात भरलेले तर असतेच पण जे मैदानात नसतात ते टीव्हीकडे डोळे लावून बसलेले असतात. 



मग तो टीव्ही घरातील असो, रस्त्यावरील दुकानात असो अथवा हॉटेलमध्ये असो. टीव्ही समोर लोकांची गर्दी उसळलेली असते. भारताचा विजय झाला तर जो जल्लोष होतो. त्याचा सोहळा दिवाळीच्या आतिषबाजीपेक्षा देद्दीप्यमान असा असतो. क्रिकेटप्रेमी असो वा नसो सगळी जनताच क्रिकेटने भारावलेली असते. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमध्ये जसा क्रिकेट मॅनिया निर्माण झालेला असतो. अशा प्रकारचा मॅनिया सध्या संपूर्ण युरोपात अनुभवास येत आहे. गेल्या सप्ताहात इटलीमध्ये फुटबॉल मॅनियाचा अनुभव घेतला. युरो चषक स्पर्धेत इटलीचा विजयरथ सुसाट असल्याने संपूर्ण देश फुटबॉलमय झाला आहे. त्याचच इटलीने इंग्लंडचा पेनाल्टी शूटआटवर मिळवलेला विजय... हा प्रत्येक इटालीयन व्यक्तीसाठी अविस्मरणीय असाच होता. उपांत्यपूर्व फेरीतील जर्मनी आणि ग्रीस विरुद्धच्या सामन्यात इटली संघाचे चाहते जर्मनीच्या विजयासाठी प्रार्थना करत होते. इटलीच्या या जर्मन प्रेमाचे कारण माहीत करुन घेतले. तेव्हा कळाले की इटलीने गेल्या अनेक लढतींमध्ये जर्मनीचा पराभव करुन जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे जर्मनीबरोबर लढत झाली तर आपला विजय निश्चत आहे ही अंतरिक भावना प्रत्येक इटालीयन फुटबॉल चाहत्याच्या चेह-यावर दिसून येत होती. सामन्या दरम्यान गोल चुकला की सर्वत्र शांतता पसरत होती आणि चाहत्यांच्या चेह-यावर नाराजी दिसत होती.  

क्रिकेट सामन्यावेळी भारतात जो अनुभव पहायला मिळतो तसाच अनुभव रोममध्ये अनुभवला. प्रत्येक सामन्याला हॉटेलमध्ये होणारी भरगच्च गर्दी आणि इटलीचा विजय झाल्यानंतर होणारी पार्टी...इटलीच्या विजयानंतर हॉटेलमध्ये होणा-या जल्लोषामध्ये तेथील कर्मचारीही सहभागी झाले होते. इटलीविरुद्ध इंग्लंडच्या सामन्यातील पेनाल्टी शूटआऊटच्या थरारानंतर मी एका महिला वेटरचे अभिनंदन केले असता तिच्या चेह-यावरील आनंद जणू इटलीने युरो चषक उंचावल्याप्रमाणे होता, ऐवढी ती उत्साहीत झाली होती. सर्व जण हात उंचावून एकमेंकाचे हात उंचावून अभिनंदन करत होते. युरो झोनवरील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या युरो चषकामुळे युरोपातील जनतेला या आर्थिक संकटाच्या तणावातून काही काळासाठी बाहेर पडण्याचा दिलासा मिळत आहे.       

1 comments:

Anonymous,  July 2, 2012 at 9:30 PM  

या सामन्याची मजा आम्ही भारतात बसून घेतली होती मॅडम...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP