Tuesday, February 24, 2015

कुठे चालला आहे महाराष्ट्र आपला!

कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची प्राणज्योत अखेर मालवली़ उपेक्षीत, शोषीत पिडीतांचा आधारवड असलेला एक लढवय्या नेता महाराष्ट्राने गमावला़ गोरगरी
ब, दलित, आदिवासी, झोपडपट्टीवासीय, फेरीवाले, कामगार, गरीब शेतकरी, घरकामगार महिला अशा सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी सतत संघर्ष करीत राहणारा, सर्व पुरोगामी सामाजिक, राजकीय,  संघटनांमध्ये कार्यरत असणारा, तरुणांचे प्रेरणास्थान असणारा एक ज्येष्ठ नेता मृत्यू शय्येवरही पाच दिवस झूंज देत राहिला, अखेर संघर्ष थांबला़ मन सामर्थ्यशाली असले तरी मारेकºयांनी शरीरावर घाव घालून ते निकामी केले होते़ त्यात ते यशस्वी झालेही असतील पण लाखोंच्या मनात त्यांनी पेरलेला विचार मरणार नाही, एवढी सुध्दा बुध्दी त्या मारेकºयांना नाही़ या तोकड्या संकूचित विचारसरणीचा जो मेंदू असतो तो राग आला की, मारुन टाकायचे एवढाच विचार करु शकतो़ बुध्दीवादी लोक विचारांचा मुकाबला विचाराने करीत असतात़ पण एखाद्या बुरसटलेल्या संकूचित विचारांवर श्रध्दा ठेवण्यासाठी प्रशिक्षीत केलेल्या लोकांची मानसिकता तशीच बनून जाते़ बुध्दीप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, सर्वधर्म समभाव, लोकशाही या मूल्यांना मानण्याचा ते विचारच करू शकत नाहीत़ त्यातून समाज हादरवून टाकणारे, दहशत निर्माण करणारे कृत्य त्यांच्याकडून घडविले जाते. अशी कथित श्रध्दावान माणसे समाज हिताला बाधा आणणारे काम करीत असतात़ अशी माणसे आणि असे संकूचित धर्मांध मेंदू जगभर सर्वत्र पसरलेले आहेत, त्याला भारत देश आणि पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्रही अपवाद नाही़ असे लोक दूसरा कोणताही विचार अथवा अन्य कोणतीही व्यवस्था मान्य करणारे नसतात़

Read more...

Wednesday, February 18, 2015

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे़़़

इतके दिवस शरद पवार आणि भाजपाची जवळीक, पवार आणि मोदींचे गुफ्तगू, पवार आणि मोदींच्या गुप्त भेटी अशी आवई अधूनमधून उठत असे; पण असे चोरून­लपून काही करणे योग्य नसल्याचे दोहो बाजूंना पटले. त्यातूनच खुल्लम खुल्ला समोर येण्याचे त्यांनी ठरवले असावे़ यापुढे आपल्याला भाजपा अस्पृश्य नाही, अशी मनाची तयारी करण्याचा संदेशच जणू त्यांनी कार्यकर्त्यांना दिला़

Read more...

ओवेसींच्या प्रभावाचा वाटा-घाटा कोणाला?

धर्माच्या नावाने राजकारण करणाºया पक्ष संघटना एकप्रकारे भारतीय संविधानालाच आव्हान देत आहेत़ ज्या संविधानाने सर्वधर्मसमभावाची भूमिका घेतली आहे़ त्या संविधानालाच शह देण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे़ ओवेसी यांना आरक्षणाचा विषय मांडण्याचा हक्क आहे, त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, याची दक्षता घेण्याचे कर्तव्यदेखील आहे़

Read more...

भांड्याला भांडं, खणखणाट, आदळआपट

नरेंद्र मोदींचा प्रभाव अजूनही कायम असल्यामुळे भाजपाला विजय मिळत असून आगामी काळात काँग्रेस पक्ष नाममात्र राहणार आहे आणि भाजपाचीच चलती होणार आहे, हे चाणाक्ष व धूर्त राजकारणी असलेल्या शरद पवारांनी ओळखले आहे़

Read more...

सरकारने केली 'स्वाभिमानी'ची ऐशीतैशी

भाजपाला बहुमतासाठी या सर्वांना सोबत ठेवणे गरजेचे झाले होते. तरीदेखील भाजपाला किमान बहुमत मिळू शकले नाही. पुढे शिवसेनेला सरकारमध्ये सहभागी केल्यामुळे सरकार बहुमतात आले असल्याने घटक पक्षांची गरज उरली नाही. आठवले आणि शेट्टी या दोघांनाही मंत्रिपदाचे लेखी आश्‍वासन देण्यात आले होते. ते पाळले नसल्याने शेट्टी यांनी आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढले.

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP