Tuesday, May 26, 2015

पुरोगामी महाराष्ट्र बलात्कारात अव्वल!

महाराष्ट्रात लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या हजारो तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवल्या जात आहेत़ बलात्कार झालेल्या स्त्रियांची उलटतपासणी करणाºया पोलिसांकडून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक
दिली जाते़ महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे आणि महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमण्याची मागणी अद्यापि पूर्ण झालेली नाही़


महाराष्ट्रात यंदाचे वर्ष हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे़ भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता बंधुता आणि स्त्री-पुरुषांना समान अधिकार अशी तरतूद करून त्यानुसार कायदे करण्यात आले; परंतु त्यांची अंमलबजावणी तर होऊ शकली नाही़ उलट ‘समता’ सोडा महिलांना सन्मानही दिला जात नाही़ त्यामुळे महिलांच्या बाबतीत पुरुषांचा दृष्टिकोन विकृत बनला आहे़ महिलांच्या सबलीकरणाची सर्वत्र चर्चा आणि पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी घेतलेली भरारी पाहता महिलांना ‘अच्छे दिन’ आले आहेत, असे वाटावे़ गेल्या शे-दोनशे वर्षांपासून समाजसुधारकांनी महिलांच्या उन्नतीसाठी जे प्रयत्न केले त्याची फळे मिळू लागली आहेत़ स्त्री शुद्रांना एकाच दावणीला बांधून गुलामगिरीत लोटणाºया प्रस्थापित रुढी-परंपरावाद्यांविरुद्ध समाजधुरीणांनी आवाज उठवला;परंतु पुरुषप्रधान समाजव्यवस्था आणि कुलदीपकाच्या भावनेने पछाडलेली माणसे यामुळे महिलांना दुय्यम स्थान तर दिलेच; पण स्त्री ही केवळ भोग्य वस्तू आहे, ही पुरुषी वर्चस्वाची मानसिकता तयार झाली़ ही मानसिकता महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि बलात्कारांना कारणीभूत ठरली आहे़ संपूर्ण देशभर महिलांवर अन्याय, अत्याचार, लैंगिक छळ, बलात्कार आणि खुनाच्या घटना घडत आहेत़ बलात्कारांच्या घटनांमध्ये पुरोगामी समजल्या जाणाºया महाराष्ट्राचा संपूर्ण देशात पहिला क्रमांक आहे़ ही लांच्छनास्पद बाब आहे़ राज्यातील जनतेची मान शरमेने खाली जावी, असा हा प्रकार आहे़ दररोज किमान एक बलात्काराची घटना घडल्याचे वृत्त येऊ लागले आहे़ छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महिलांच्या उन्नतीसाठी अहोरात्र कष्ट करणारे, त्यांच्या शिक्षणासाठी झटणारे आणि समतेचा संदेश सर्वदूर पसरवणारे महापुरुष महाराष्ट्राने या देशाला दिले आहेत़ स्त्री-पुरुषसमतेचा पुरस्कार करणारे महात्मे ज्या राज्यात निर्माण झाले, त्या राज्यात बुरसटलेली पुरुषी मानसिकता अद्यापि कायम असून या राज्याने केवळ पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरला आहे की काय, असे वाटते़ हा बुरखा फाडून सत्य उघड करण्याचे काम नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालाने केले आहे़ २०१४ सालामध्ये बलात्काराच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे़ दिल्लीतील सामूहिक बलात्काराचे ‘निर्भया’ प्रकरण घडल्यानंतर २०१३मध्ये गुन्हेगारी कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या उद्देशाने नव्या कायद्यात जन्मठेप आणि काही प्रकरणात
मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली़ कायद्यामध्ये सुधारणा करून २० वर्षे तुरुंगवासाऐवजी जन्मठेप अशी तरतूद करण्यात आली़ अ‍ॅसिड हल्ले किंवा लैंगिक गुन्ह्यांकरिता कडक शिक्षेची तरतूद करण्यात
आली आहे़ कायदे कितीही कठोर असले, तरी कायद्याची भीतीच लोकांना वाटत नाही़ कायदा कडक केला असला, तरी गेल्या दोन वर्षांत बलात्कारांच्या प्रमाणात किंचीतही घट झाली नाही़ उलट बलात्काराचे प्रमाण वाढत चालले आहे़ शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, संघटित-असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाºया महिलांसह दोन-तीन वर्षांच्या कोवळ्या बालिकांपासून ७५ वर्षांच्या वृद्ध महिलांपर्यंत तमाम महिला अत्याचाराला बळी पडत आहेत़ ही विकृतीची विषवल्ली कशी ठेचून काढणार? हा प्रश्न भेडसावत आहे़ नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या २०१४ च्या अहवालामध्ये महाराष्ट्रात १३,८२७ बलात्कार प्रकरणे झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ दुसºया क्रमांकावर मध्य प्रदेश असून या राज्यात
१३,३२३ तर तिसºया क्रमांकावर आंध्र प्रदेशमध्ये १३,२६७ बलात्कार प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत़ २०१३ मध्ये देशात एकूण ३३,७०७ बलात्कार प्रकरणे नोंदवण्यात आली असून त्यात मध्य प्रदेशात ४,३३५,  जस्थानात
३,२८५, तर महाराष्ट्रात ३,०६३ बलात्कार प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे़ २०१२ मध्ये देशात २४,९२३
प्रकरणांची नोंद झाली असून त्यापैकी मध्य प्रदेशात ३,४२५, राजस्थानात २,०४९, तर महाराष्ट्रात १,८३९ बलात्कार प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत़ २०१२ आणि २०१३ मध्ये तिसºया क्रमांकावर असलेला महाराष्ट्र २०१४ मध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे़ महिलांची शारीरिक, मानसिक छळवणूक आणि बलात्कार करणाºया गुन्हेगाराला मारून टाकले पाहिजे, त्याचा मरेपर्यंत छळ केला पाहिजे,
अशी संतापजनक प्रतिक्रिया महिलावर्गामध्ये उमटत असते; परंतु अशा प्रकारे बलात्काºयांना शिक्षा देण्याची तरतूद भारतातील कायद्यांमध्ये नाही. कायद्याची भीती वाटावी, असे कठोर कायदे लोकशाहीमध्ये  सल्यामुळे बलात्काºयांची भीड चेपली आहे़ इस्लामी देशांमध्ये बलात्कारी व्यक्तीला दगडाने ठेचून ठार मारणे, शरीराचे अवयव छाटणे, फाशी देणे, लिंग कापणे, गोळ्या घालून ठार करणे, अशा प्रकारच्या शिक्षा भर चौकात दिल्या
जातात़ याच शिक्षा भारतातही दिल्या जाव्यात, अशी पीडितांची भावना असते़ या घटना जितक्या क्लेशदायक,
तिरस्करणीय, संतापजनक असतात तेवढीच तीव्र भावना बलात्काºयाच्या शिक्षेबद्दलही असते़ संयुक्त अरब
अमिराती, इराण, इराक, अफगाणिस्थान, मलेशिया आदी देशांमध्ये बलात्काºयाला आरोप सिद्ध झाल्यानंतर २४ तास ते आठ दिवसांत फाशी देण्याची शिक्षा आहे़ चीनसारख्या देशांमध्ये आठ दिवसांत फाशी दिली जाते़ तालिबानमध्ये तर बलात्काºयाचे अवयव कापून त्याला मरेपर्यंत दगडाने ठेचले जाते़ आपल्या देशातही सर्वसामान्यांची बलात्काºयांबाबत हीच भावना असते़ आपल्या भारत देशात मात्र बलात्कारी व्यक्ती तुरुंगात पोलीस संरक्षणात राहत असून त्यांना चार वेळा जेवण दिले जात असते़ अनेक वेळा असे आरोपी न्यायालयात सबळ पुराव्यांअभावी सुटून ते उजळ माथ्याने मिरवत असतात़ महाराष्ट्रात लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या हजारो तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवल्या त आहेत़ महिलांच्या छेडछाडीच्या असंख्य घटना घडत आहेत़ बलात्कार झालेल्या स्त्रियांची उलटतपासणी करणाºया पोलिसांकडून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जाते़ महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे आणि महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमण्याची मागणी अद्यापपूर्ण झालेली नाही़ छेडछाडीला कंटाळून पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथे एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला़ रेल्वेने दररोज प्रवास करणाºया महिला व विद्यार्थिनींची छेडछाड करण्याच्या तक्रारी वाढत आहेत़ अपहरण, खून, लैंगिक छळ, कुटुंबातील व्यक्तींकडून होणारे बलात्कार, मानसिक व शारीरिक छळवणूक, छेडछाड, सायबर इंटरनेटचे गुन्हे,
हुंडाबळी, घरगुती कौटुंबिक छळ असे अनेक प्रकारचे गुन्हे महिलांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात घडत आहेत़
शोषित, पीडित, उपेक्षित, वंचित, पददलित, अनुसूचित जाती-जमातीतील महिलांचे प्रश्न तर आणखीनच जटील  आहेत़ जातीभेद आणि धर्मभेदाची मानसिकतादेखील या महिलांच्या छळवणुकीला कारणीभूत ठरत आहे़ राज्यभर बलात्काराच्या शिकार ठरल्या असल्याची प्रकरणे नोंदवली जात आहेत़ अलीकडेच मुंबईत वडाळा येथे एका पाच वर्षांच्या निष्पाप बालिकेवर बलात्काराचा प्रसंग ओढवला़ तत्पूर्वी तीन वर्षांपूर्वी मुंबईतील कफ परेड भागात अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली़ महिला व लहान मुलींना गुंगीचे औषध देऊन बलात्कार केले जातात़ छायाचित्रे काढून ब्लॅकमेल करून बलात्कार केले जातात़ पोलिसांकडून, शासकीय अधिकारी व कर्मचाºयांकडून महिलांचे शोषण, लैंगिक छळ आणि बलात्कार झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ आपल्या देशात दर दोन मिनिटाला एक बलात्कार होऊ लागला आहे़ या राज्यात लहान बालकांपासून वयोवृद्ध  महिलांपर्यंत कुणीही महिला सुरक्षित नाहीत, असे भयंकर गुन्हे घडल्यानंतर वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमे, सामाजिक संस्था, स्त्रीवादी संघटना ओरड करतात, निषेध करतात;
परंतु काही दिवसांतच सगळे वातावरण थंड होते़ गोरगरीब महिलांवर झालेल्या अत्याचाराची  सारमाध्यमेदेखील फारशी दखल घेत नाहीत़ दिल्लीतील निर्भयाचे एक प्रकरण प्रसारमाध्यमांनी लावून धरले़ ते गांभीर्य आणि ती तीव्रता अन्य प्रकरणांमध्ये दिसून आलेली नाही़ ही विकृती रोखायची असेल, तर संघटित प्रयत्नाने पुरुषी मानसिकतेवर प्रहार करावे लागतील़ महिलांच्या स्त्रीत्वावर घाला घालण्याचे तिरस्करणीय प्रकार होत आहेत त्याविरुद्ध संघटितपणे आवाज उठवावा लागेल़ तसेच बलात्कार सिद्ध होताच वेळकाढूपणा न करता शासनाने त्वरित फाशी दिली, तरच जरब बसू शकेल़ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेली समता, समरसता निर्माण करायची असेल, तर राज्यभर तसे वातावरण तयार करावे लागेल; अन्यथा इतर
घोषणांप्रमाणे ही घोषणादेखील कागदावरच राहील़

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP