Tuesday, April 3, 2012

लावण्या की मागण्या?


वारी आणि बारीला सारखेच प्रोत्साहन देऊन महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा जतन करण्यास मनोभावे सहकार्य करणा-या सदस्यांसाठी लावणी महोत्सवाचे आगळे-वेगळे महत्त्व नक्कीच आहे. सोमवारी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजित केलेल्या लावणी महोत्सवाकडे सदस्यांचे लक्ष लागणे साहजिक होते. पण म्हणून मागण्यांपेक्षा लावण्या महत्त्वाच्या असाव्यात का असा प्रश्न उपस्थित झाला खरा आणि तो योग्यही होता. पण लावणीचे वेध लागले होते, त्याला कोण काय करणार?

अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यावरील चर्चा वाढत चालली तेव्हा एक एक सदस्य सभागृहाबाहेर पडू लागलेअध्यक्षस्थानी असलेले तालिका अध्यक्षही चर्चा आवरती घेण्याच्या मूडमध्ये होते कारण सर्व गटनेत्यांच्या बैठकीतच चच्रेचा कालावधी ठरवण्यात आला होतासभागृहात बदललेले वातावरण लक्षात येताच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतला आणि मागण्या हव्या की लावण्या असा संतप्त सवाल त्यांनी केलात्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चर्चेचा तपशील देऊन विरोधी पक्षनेत्यांचा आक्षेप परतवण्याचा प्रयत्न केलाउद्योगमंत्री नारायण राणे यांनीही विरोधी पक्षनेत्यांचा आक्षेप योग्य नसून सविस्तर चर्चा झाल्याचे लक्षात आणून दिलेचार ते सहा तास चर्चा झाल्यानंतर मात्र सदस्यांचे लक्ष मागण्यात लागेनात्यांना बहुतेक लावण्यांचे वेध लागले असावेतसत्ताधारी बाकावरची उपस्थिती फारच कमी झालेली पाहून शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या मीनाक्षीताई पाटील यांनी आक्षेप घेतलासत्ताधारी बाकावर कोरम नसल्याचे त्यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले तेव्हा सदस्यांना सभागृहात बोलावण्यासाठी धावाधाव झाली पण बाहेर पडलेले सदस्य येणार कसेत्यांची पावले बहुधा एनसीपीएतील लावणी महोत्सवाकडे वळली असावीत.

लावणी महोत्सवात ढोलकीवर थाप पडली आणि घुंगराच्या ठेक्यावर लावणी कलावंतांचे पाय थिरकू लागले की सगळे राजकीय अभिनिवेश बाजूला सारून अदाकारीला दाद देण्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया नाटय़गृहात उमटतेआपण वारीलाच जातोबारीला जात नाही अशी बतावणी करणाऱ्या गृहमंत्री आरआरपाटील यांनीही विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मला बारीला न्या’ अशी जाहीर मागणी केली होतीतेव्हा बारीमध्ये वारी शोधण्याची उज्ज्वल परंपरा जपतलावणी महोत्सव जोरात सुरू झालायपण सरकारने मात्र लावण्यांपेक्षा मागण्यांना प्राधान्य देऊन त्या मंजूर करून घेतल्या ख-या.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP