Monday, December 30, 2013
Monday, December 23, 2013
देवयानीला दलित कार्ड ठरवताहेत..!
भारत-अमेरिका संबंधावर प्रकाश टाकणारे आणि सार्या जगाचे लक्ष वेधून घेणारे देवयानी खोब्रागडे अटक प्रकरण गंभीर वळण घेत असताना देवयानीला जातीपातीच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवण्याचा आणि दलित कार्डमधून तिचा राजकारणासाठी वापर करण्याचा संकुचित आणि पोरकट प्रकार घडू लागला आहे.
Labels:
जय महाराष्ट्र
Monday, December 16, 2013
लोकपाल हा प्रेषित नव्हे!
देशातील भ्रष्टाचार निपटून काढून स्वच्छ प्रशासन देण्याचा एकमेव पर्याय म्हणजे लोकपाल, असा अट्टाहास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी धरला. त्यासाठी पुन्हा एकवार उपोषणाचे हत्यार उपसले. तिकडे नवी दिल्लीत संसदेने लोकपाल विधेयक संमत करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या असतानाही अण्णांनी राळेगणसिद्धीत उपोषण करण्याचा निर्णय घेऊन तो अमलात आणला. त्यांच्या उपोषणाला चांगला प्रतिसादही मिळाला आणि आंदोलनाच्या रेट्यामुळे संसदेच्या चालू अधिवेशनातच विधेयक मंजूर करण्याचे जाहीर करण्यात आले. आंदोलन यशस्वी झाल्याची पावतीच मिळाल्यामुळे अण्णांनी समाधान व्यक्त केले.
Labels:
जय महाराष्ट्र
Monday, December 9, 2013
महाराष्ट्रात चमत्कार होणार का?
शीला दीक्षित यांनी
चांगला कारभार करूनही केंद्रातील धोरणांचा, घोटाळय़ांचा, भ्रष्टाचाराचा
परिणाम त्यांच्या निवडणुकीवर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तीन टर्म
पूर्ण झाल्यानंतर चौथ्या टर्मसाठी जनमताचा कौल मिळेल का की इथेही चमत्कार
होईल, हा प्रश्न असून चार राज्यांच्या निवडणुकीने आघाडी सरकारला धोक्याचा
इशारा दिला आहे.
Labels:
जय महाराष्ट्र
Monday, December 2, 2013
उसाच्या फडात रंगले राजकारण
उसाची पहिली उचल प्रतिटन ३000 रुपये मिळाली पाहिजे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. विशेष म्हणजे ३000 रुपयांऐवजी २६५0 रुपयांवर तडजोड झाल्याने उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. तर आंदोनल मागे घेण्याचे श्रेय कोणाला यावरून वादावादी रंगू लागली. २६५0 रुपये ऊस दरापैकी २२00 रुपये पहिल्या टप्प्यात व उर्वरित ४५0 रुपयांची मदत केंद्र व राज्य पातळीवर देण्यात यावी, असे ठरवण्यात आले आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी होणार्या बैठकीत ४५0 रुपयांपेक्षा अधिक रक्कम किती मिळणार याची शेतकर्यांना उत्सुकता आहे. मात्र त्याचबरोबर २६५0 वर तडजोड होताना उसाच्या फडात जे राजकारण झाले, त्याचीही चर्चा होऊ लागली आहे.
Labels:
जय महाराष्ट्र
Subscribe to:
Posts (Atom)