कुठे चालला आहे महाराष्ट्र आपला!
कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची प्राणज्योत अखेर मालवली़ उपेक्षीत, शोषीत पिडीतांचा आधारवड असलेला एक लढवय्या नेता महाराष्ट्राने गमावला़ गोरगरी
ब, दलित, आदिवासी, झोपडपट्टीवासीय, फेरीवाले, कामगार, गरीब शेतकरी, घरकामगार महिला अशा सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी सतत संघर्ष करीत राहणारा, सर्व पुरोगामी सामाजिक, राजकीय, संघटनांमध्ये कार्यरत असणारा, तरुणांचे प्रेरणास्थान असणारा एक ज्येष्ठ नेता मृत्यू शय्येवरही पाच दिवस झूंज देत राहिला, अखेर संघर्ष थांबला़ मन सामर्थ्यशाली असले तरी मारेकºयांनी शरीरावर घाव घालून ते निकामी केले होते़ त्यात ते यशस्वी झालेही असतील पण लाखोंच्या मनात त्यांनी पेरलेला विचार मरणार नाही, एवढी सुध्दा बुध्दी त्या मारेकºयांना नाही़ या तोकड्या संकूचित विचारसरणीचा जो मेंदू असतो तो राग आला की, मारुन टाकायचे एवढाच विचार करु शकतो़ बुध्दीवादी लोक विचारांचा मुकाबला विचाराने करीत असतात़ पण एखाद्या बुरसटलेल्या संकूचित विचारांवर श्रध्दा ठेवण्यासाठी प्रशिक्षीत केलेल्या लोकांची मानसिकता तशीच बनून जाते़ बुध्दीप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, सर्वधर्म समभाव, लोकशाही या मूल्यांना मानण्याचा ते विचारच करू शकत नाहीत़ त्यातून समाज हादरवून टाकणारे, दहशत निर्माण करणारे कृत्य त्यांच्याकडून घडविले जाते. अशी कथित श्रध्दावान माणसे समाज हिताला बाधा आणणारे काम करीत असतात़ अशी माणसे आणि असे संकूचित धर्मांध मेंदू जगभर सर्वत्र पसरलेले आहेत, त्याला भारत देश आणि पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्रही अपवाद नाही़ असे लोक दूसरा कोणताही विचार अथवा अन्य कोणतीही व्यवस्था मान्य करणारे नसतात़