Monday, August 3, 2015

देशभक्त कलामांना सलाम; देशद्रोह्याला फाशी

गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे म्हणजे गुन्हेगारांना जरब बसवून त्यातून कायद्याचे पालन करण्याची जाणीव समाजात निर्माण होणे, हा उद्देश आहे़ समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी समाजकंटकांना व देशद्रोह्यांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे़

धर्माच्या नावाने सुरू असलेल्या चळवळींमध्ये गुंडगिरी घुसली असून बिनदिक्कतपणे माणसे मारली जात आहेत. अशा गुंडांना कठोरात कठोर शासन झालेच पाहिजे, अशी जनभावना आहे़ माणसाला जीवदान देता येत नसेल पण निर्दयीपणे जीव घेतला जात असेल तर अशा गुंडांचे करायचे काय? त्याला मारूनही मेलेल्या माणसाला खºया अर्थाने न्याय मिळू शकत नाही़ कारण त्या गुन्हेगाराने निरपराध माणसाचे आयुष्य संपवलेले असते आणि त्याच्या कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त केलेले असते़ म्हणूनच दुसºयाचा जीव घेणाºया प्रवृत्तीला ठेचून काढलेच पाहिजे़ त्यासाठी फाशीसारखी शिक्षा योग्यच आहे. आपल्या देशातील कायद्यातून फाशीची शिक्षा वगळण्यात आली तर ती गोष्ट निराळी; परंतु ही तरतूद करण्यात आली असल्यामुळे कायद्याच्या निकषावर कोणाला फाशी दिली तर त्यावर उलटसुलट चर्चा होणे हे अप्रस्तूत आहे़
नुकत्याच झालेल्या दोन घटनांनी संपूर्ण देशभर चर्चेला उधाण आले. प्रसिद्धीमाध्यमांनीही या दोन घटनांना भरपूर प्रसिद्धी दिली़ त्यापैकी मनाला चटका लावणारी घटना म्हणजे या देशाचे सुपुत्र माजी राष्ट्रपती आणि भारताचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगात ओळख असलेले ए़पी़जे़ अब्दुल कलाम यांचे निधन आणि दुसरी घटना म्हणजे मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडवणाºया कटातील एक साथीदार याकूब मेमन याची फाशी़ या दोन्ही व्यक्तींना एकाच दिवशी दफन करण्यात आले, मात्र या दोन्ही घटनांचे लोकांमध्ये ज्या प्रकारचे पडसाद उमटले, ते पाहता त्यात जमीन-अस्मानचे अंतर दिसले़ भारताचे मिसाईल मॅन असलेल्या अब्दुल कलाम यांचा स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र तयार करण्यात सिंहाचा वाटा होता़ त्रिशूळ, अग्नी, आकाश, नाग या लांबपल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची निर्मिती त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आली़ म्हणूनच आज भारताची संरक्षण सिद्धता जगमान्य झाली आहे़ २००१मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर कलाम राष्ट्रपती झाले़ त्या वेळी त्यांची अपार राष्ट्रनिष्ठा आणि देशाला महासत्ता बनवण्याचे त्यांचे उदात्त ध्येय व त्यासाठी ते करत असलेली अथक मेहनत लक्षात घेऊन सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला़
सच्चे देशभक्त, निस्सीम त्यागी व्यक्तिमत्त्व, कर्तव्यतत्पर अशा कलामांनी लहान मुले आणि तरुण हे उद्याचे आशास्थान असल्याचे मानून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना मार्गदर्शन केले़ त्यामुळेच इतर राष्ट्रपतींपेक्षा त्यांना जास्त लोकप्रियता मिळाली. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात पराकोटीचे आदराचे स्थान निर्माण झाले होते़ म्हणूनच त्यांच्या जाण्याने देशातील करोडो लोकांना दु:ख झाले़ त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंचा जनसागर उसळला़ त्यांच्या अंत्यविधीचे प्रक्षेपण पाहून लाखो लोक व्याकूळ झाले. त्यांना अश्रू आवरले नाहीत़ त्याच दिवशी योगायोगाने याकूब मेमन या मुंबई बॉम्बस्फोटातील सूत्रधाराला फाशी दिली गेली व त्याच दिवशी त्याचा अंत्यविधी मुंबई येथे उरकण्यात आला़ तसे पाहता या दोन व्यक्तींमध्ये तुलना करणे योग्य नाही; परंतु एकाच दिवशी या दोन व्यक्तींच्या जाण्याचीच चर्चा दिवसभर सुरू होती़
कलाम हे सच्चे देशभक्त होते आणि देशभक्ताला कोणताही धर्म नसतो. तो साºया देशाचा असतो व देश हाच त्याचा धर्म असतो़ अशी देशभक्त व्यक्ती धर्माच्या जोखडात कधी अडकून पडलेली नसते़ देशही अशा महापुरुषाला धर्माचे लेबल लावत नसतो़ देशासाठी त्याग करणाºया, सर्वस्व अर्पण करणाºया महापुरुषांना देश नेहमी जिवंत ठेवत असतो़ ते त्यांच्या कार्याने अमर होत असतात. अशा व्यक्ती धर्मातीत असतात़ कलाम हे त्यापैकीच एक होते़ याउलट गुन्हेगार हा कोणत्याही जातीधर्मात जन्मला असला तरी त्याच्या कुकर्मामुळे त्याचा धर्म ‘गुन्हेगारी’ हाच ठरतो़ कोणताही धर्म प्रथम मानवतेची शिकवण देतो. निरपराध, निष्पाप माणसांना निष्ठूरपणे ठार मारा, असे जगातला कोणताही धर्म सांगत नाही़ म्हणून असे गुन्हेगार प्रथम त्याच्या धर्माचे शत्रू ठरतात़ नंतर ते देशाचे आणि समाजाचे शत्रू असतात, हे सर्वमान्य सत्य आहे़ याकूब त्याच्या कुकर्माने फाशीवर गेला, तर कलाम यांनी महान कार्य करून ते अमर झाले़ कलाम यांच्या अंत्ययात्रेला जे लाखो लोक उपस्थित होते, ते सर्व जातीधर्माचे होते़ याउलट धर्मांध व्यक्ती, जे स्वत:ला धर्माचे ठेकेदार समजतात, त्या व्यक्ती त्या त्या समाजातील लोकांमध्ये अधिक लोकप्रिय असतात. त्यामुळेच की काय याकूबच्या अंत्यविधीला लोकांनी मोठी गर्दी केली होती़
याकूबच्या फाशीवर बरेच वादंगही उठले़ मुळातच फाशीला विरोध असणारे विचारवंत, साहित्यिक, राजकारणी नेते, अभिनेते एकत्र आले़ फाशीच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे रात्री २.३० वाजता उघडण्यात आले आणि त्यामध्ये आरोपीला बचावाची संधी अखेरपर्यंत देण्यात आली. परंतु याकूब मेमनच्या विरोधात इतके भक्कम पुरावे होते की टाडा न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यापर्यंत याकूबच्या प्रकरणाचा किस पाडण्यात आला़ त्यात बॉम्बस्फोटाच्या सूत्रधारांमध्ये याकूब असल्याचे सिद्ध झाले़ शेवटी राष्ट्रपतींकडे दया याचिका, राज्यपालांकडे दया याचिका हे सगळे सोपस्कार पार पडले, मात्र भक्कम पुराव्यांमुळे याकूबची फाशीची शिक्षा   शेवटपर्यंत टिकली, त्यात बदल होऊ शकला नाही़ मुंबईत बॉम्बस्फोट घडवून देशात अशांतता निर्माण करण्याचा, एकप्रकारे देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचणारे दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांनाही अशीच कठोर शिक्षा झाली पाहिजे़
देशातील सर्व वृत्तवाहिन्यांवर याकूब फाशी प्रकरणाची चर्चा होताना अनेकांच्या मनात अनेक प्रश्न येऊन गेले़ मुंबईतील २५७ लोक मृत्युमुखी व ७१३ लोकांचे आयुष्य बरबाद करणाºया याकूबला शेवटी फाशी दिल्यामुळे बळींना न्याय मिळाला, अशीही प्रतिक्रिया उमटली़ काहींनी फाशी टाळण्यासाठी केलेला अट्टाहास खटकणारा होता़ या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली़ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध भाष्य करणाºयांवर त्यांनी टीका करताना सर्वोच्च न्यायालय बंद करून टाका अथवा निकालानंतर बोलणाºयांवर कारवाई करा,’ असे वक्तव्य केले असले तरी अलीकडे न्यायालयांवर टीका होऊ लागली आहे़ न्यायालयांवर लोकांचा विश्वास असल्यामुळे त्यांच्यावर अधिक जबाबदारी असून सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा आहे़ देशात अशांतता माजवून जातीय द्वेष वाढवणाºया शक्ती कोणत्याही धर्माच्या असोत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे़ मग तो मुंबईचा बॉम्बस्फोट असो अथवा मालेगावचा, बाबरी मशीद पाडल्यानंतरची दंगल असो अथवा अन्य कोणतीही जातीय दंगल असो, सर्वांना समान न्याय देऊन न्यायालयांनी नि:स्पृहतेचे दर्शन घडवले पाहिजे़ देशात गेल्या दहा वर्षांत एकूण ५ हजार ५४ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती़ त्यातील ३७५१ लोकांची शिक्षा रद्द होऊन तिचे रूपांतर जन्मठेपेत करण्यात आले, तर १३०३ लोकांची फाशीची शिक्षा कायम राहिली़ मात्र आजमितीपर्यंत फक्त चार जणांना फाशी देण्यात आली आहे़ त्यापैकी २००४मध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याचा आरोप सिद्ध झालेल्या धनंजय चटर्जी याला  पश्चिम बंगालमधील अलिपूर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली़ त्यानंतर मुंबईवर झालेल्या भयाण हल्ल्याप्र
अलीकडील या तिन्ही फाशीच्या घटना या देशद्रोहाच्या आरोपावरून दिल्या गेल्या आहेत़ आपल्या देशाविरुद्ध बंड करणाºया, युद्ध करणाºया व्यक्तीला तसेच बंडास प्रवृत्त करणाºया व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली गेली आहे, तशी शिक्षा देण्याची तरतूद आपल्या कायद्यामध्ये आहे़ अत्यंत अघोरी स्वरूपाचा खून केल्यास, घोर अपराध केल्यास फाशीची शिक्षा दिली जाते. मात्र फाशी देण्यासाठी गुन्ह्याच्या गांभीर्याची कारणे न्यायालयाने नमूद करणे आवश्यक असते़  गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे म्हणजे गुन्हेगारांना जरब बसवून त्यातून कायद्याचे पालन करण्याची जाणीव समाजात निर्माण होणे हा उद्देश आहे़ समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी समाजकंटकांना व देशद्रोह्यांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे़

करणी अजमल कसाब याला त्यानंतर संसदेवरील हल्ल्याप्रकरणी अफझल गुरूला आणि आता मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी याकूब मेमनला फाशी देण्यात आली आहे़

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP