Tuesday, February 15, 2011

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे


उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पत्रकार यांच्यात वाद उभा राहिला. अजितदादा त्यांच्या स्वभावानुसार ताठर भूमिकेत असल्यामुळे शरद पवारांना हाताळण्यासाठी पुढे यावे लागले, पुतण्याचे ओझे काकांना खांद्यावर घ्यावे लागले. राजकारणाचा एकही कोपरा किंवा कप्पा चर्चेविना राहिला आहे, असे दिसत नाही. विलासराव देशमुखांचे ओझे न्या. गांगुलींनी आपल्या डोक्यावर घेतले आहे. तर अशोक चव्हाणांचे ओझे हायकमांडने पृथ्वीराज चव्हाणांच्या खांद्यावर ठेवले आहे. रामदास आठवलेही हम भी कुछ कम नहीच्या तो-यात झळकू लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला जड झालेले आठवलेंचे ओझे डोक्यावर घेण्याची घाई शिवसेना-भाजपला लागली आहे.

भूकंपाचे हादरेही कमी पडावेत इतक्या मोठय़ा प्रमाणात राज्यात सध्या हादरे सुरू आहेत. सार्वजनिक जीवनाच्या सर्वच आघाडय़ांवर राज्य पिछाडीवर आहे की कायअशी शंका निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्ष जसे महाराष्ट्राचे आहे तसे गुजरातचेही आहे. पण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘गुजरात शायनिंगची धूम उठविली आहे. उद्योगधंद्याचे जाळे विणले जात आहे. सिंचन क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळतो आहे.?याचा प्रचार व प्रसार सर्व दूर केला जात आहे. महाराष्ट्रात मात्र प्रत्येक आघाडीवर पिछाडी सुरू आहे. राज्यापुढील नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रश्नांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणदेखील चक्रावून गेले असतील. महाराष्ट्राची गंगा प्रदूषणयुक्तथंड हवेचे लवासा प्रकरणटू जी घोटाळा बलवा प्रकरणयूलसी घोटाळाआदर्श घोटाळाअनेक भूखंडांची श्रीखंड प्रकरणेअशा घोटाळय़ांच्या मालिकांबरोबरच कांद्याचे चढ-उतारशेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि तेलमाफियांच्या आगीत जळता महाराष्ट्र असे सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राचे चित्र आहेही बाब निश्चितच लांच्छनास्पद आहे. मिस्टर क्लीन म्हणून सूत्रे हाती घेतलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ठिकठिकाणी पडलेली भोके बुजविण्यासाठी ठिगळे लावावी लागणार आहेत.  चव्हाण यांनी एकीकडे बिल्डर लॉबीला अंगावर घेतले आहे. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधीआमदारखासदारमंत्री यांची कामे होत नाहीत. फायलींवर लवकर निर्णय होत नाहीतअशा तक्रारी सुरू झाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ठिणग्या पडू लागल्या आहेत. या दोन्ही पक्षांना जणू काही एकमेकांचे ओझे झाले आहे. भरीस भर म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पत्रकार यांच्यात वाद उभा राहिला. अजितदादा त्यांच्या स्वभावानुसार ताठर भूमिकेत असल्यामुळे शरद पवारांना परिस्थिती हाताळण्यासाठी पुढे यावे लागलेपुतण्याचे ओझे काकांना खांद्यावर घ्यावे लागले. राजकारणाचा एकही कोपरा किंवा कप्पा चर्चेविना राहिला आहेअसे दिसत नाही. विलासराव देशमुखांचे ओझे न्या. गांगुलींनी आपल्या डोक्यावर घेतले,तर अशोक चव्हाणांचे ओझे हायकमांडने पृथ्वीराज चव्हाणांच्या खांद्यावर ठेवले आहे. रामदास आठवलेही ‘हम भी कुछ कम नहीच्या तोऱ्यात झळकू लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला जड झालेले आठवलेंचे ओझे डोक्यावर घेण्याची घाई शिवसेना-भाजपला लागली आहे. अजितदादा -पत्रकार वादात लोकमान्य टिळकांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले. यानिमित्ताने टिळकांचा करारी  बाणा प्रकर्षाने पुढे आला. फुले-आंबेडकर-गांधी हेही पत्रकारच होते. पण व्यक्ती आणि पत्रकार म्हणून असलेला टिळकांचा करारी बाणाअजितदादांइतकाच पत्रकारांनाही आदर्श वाटावा असे घडले खरे. ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीतमी टरफले उचलणार नाही,’ असा करारीपणा टिळकांनी विद्यार्थीदशेत दाखवला होता.?त्याचे अनुकरण करीत अजितदादा यांनी पत्रकारांची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. ‘पत्रकारांना झोडपून काढा असे मी बोललो नाहीते मी स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही,’असा खुलासा अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केलातर अजितदादांनी पत्रकारांसाठी दंडुकेशाहीची भाषा वापरलीअसा दावा करीत पत्रकार संघटनांनी लोकमान्य टिळकांच्या गिरगाव चौपाटीवरील पुतळय़ापासून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केली. लोकमान्य टिळकांच्या लोकमान्यता पावलेल्या या दोन करारीबाण्यांचा ताण घालविणार कोण आणि कसा असा कठीण प्रसंग महाराष्ट्रात उभा राहिला.


चार-पाच दिवस पुलाखालून बरेच पाणी वाहून  गेले. साता-यात  पत्रकारांवर घसरलेले पवारकाका हे कोल्हापुरात सावरले आणि त्यांनी नरमाईची भाषा सुरू केली. शरद पवारांनी स्पष्टपणे दिलगिरी व्यक्त केलेली नाही. जर-तरच्या भाषेत दिलगिरीचा उल्लेख केलापण पत्रकारांना ‘दिलगिरी’ शब्द महत्त्वाचा वाटलामग तो कोणत्या संदर्भात उच्चारला हे पडताळण्याचीही त्यांना गरज वाटली नाही. अजितदादांवर आणि मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर टाकलेला बहिष्कार मागे घेण्याची त्यांना जणू घाई झाली होती. दादा सुटलेकाका सुटले आणि पत्रकारांनीही सुटकेचा निश्वास टाकला. पवारकाकांचे ओझे खरेच हलके झाले काहे आता काळच ठरविल.

अजितदादांनी कधी पत्रकारांच्या गळ्यात गळे घातले नाहीतकधी स्वत:ची पत्रकार ब्रिगेड तयार केली नाहीकधी मोठय़ा वृत्तपत्रांच्या पत्रकारांचे कोंडाळे आपल्यासोबत ठेवले नाही. त्यामुळे त्यांना पत्रकार दूर गेल्याचा फरक पडणार नाही. मात्र पत्रकारांच्या सान्निध्याचा ध्यास असलेल्या राष्ट्रवादी मंत्र्यांची चांगलीच पंचाईत झाली होती.?दादांची बाजू घ्यावी तर कोंडाळे नाराज आणि पत्रकारांची बाजू घ्यावी तर दादांचा रोष. कदाचित हे जाणूनच दादांचे ओझे आपल्या खांद्यावर घेऊन मार्ग काढण्यासाठी शरद पवार पुढे आले असावेत. यापूर्वी पत्रकारांनी अनेक नेत्यांना लक्ष्य केले होते. पण नेत्यांनी पत्रकारांना लक्ष्य केले नाही. उलट टीकेकडे दुर्लक्ष करून नेते आपले लक्ष्य गाठू इच्छित होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांचे उदाहरण उत्तम आहे. मायावतींचे सरकार येऊ शकेलअसे पत्रकारांना वाटतच नव्हते. एक्झिट पोलनेही मायावतींची दखल घेतली नव्हती. पण त्या पत्रकारांच्या नादी लागल्या नाहीत. प्रत्यक्ष निकाल लागला आणि एक्झिट पोलचा पोलखोल झाला.

अजितदादांचे ओझे तर पवारांनी घेतले खरे. पण मुख्यमंत्र्यांचे काय करावेअसा प्रश्न सध्या दबक्या आवाजात चर्चिला जात आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ प्रशासनाभिमुख राहण्याऐवजी लोकाभिमुख होण्याची गरज आहे. फाईल क्लिअर झाल्या नाहीत तर मंत्रीआमदारखासदार कडवट प्रतिक्रिया देत असतातसतत अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या तर बदनामीशिवाय हाती दुसरे काही पडत नाहीयाची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी. दुधाने तोंड?भाजले की ताकही फुंकून प्यावे लागते हेही मान्य आहे. परंतु लोकांसाठी काम करताना थोडेसे लवचिकदयाळूमायाळू राहावे लागते. मिस्टर क्लीन म्हणून काम करताना स्वत:च क्लीन बोल्ड होण्याची वेळ?येऊ देऊ नका. अशोक चव्हाणही असेच वागत होते. 16 हजार फाईली ठेऊन गेले. गेले कसलेअलगद त्यांचा  कॅच घेतला. आपल्याच बॅटने स्टम्प उडवून हिट विकेट ठरली आणि पृथ्वीराज बाबांवर खेळ सावरण्याचे भलेमोठे ओझे येऊन पडले.

विलासराव देशमुख यांना सावकार आमदार दिलीप सानंदा प्रकरणी न्यायालयाने 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहेमात्र काँग्रेस हाय कमांडने त्यांना बढती देऊन ग्रामीण विकास खात्याचे केंद्रीय मंत्रिपद दिले. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना बढती दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ए. के. गांगुली यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते मंत्रिपदी कसे काय राहू शकतातअसा सवाल त्यांनी केला. खरे तर एकदा निर्णय दिल्यानंतर आपल्याच निर्णयावर पुनश्च जाहीर वाच्यता करणे संकेतांना धरून नाही. परंतु गांगुलींचा व्यक्तिद्वेष एवढा की त्यांनी विलासरावांविरुद्ध कडक भूमिका घेतली व त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. विलासरावांचा काय निर्णय घ्यायचाते हायकमांड पाहून घेईल. निकाल दिला की न्यायाधीशाचे काम संपले. त्यानंतरचे निर्णय पक्षाला घ्यायचे आहेत. न्यायाधीशांनी न्यायपीठावर निर्णय द्यावेतपण शासन प्रशासनाचे ओझे आपल्याच खांद्यावर असल्याच्या तो-यात वावरू नयेलोकांची ती अपेक्षा नाही. लोकशाहीचे शासनप्रशासन,न्यायपालिका आणि पत्रकारिता हे चारही खांब एकमेकांत हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नात असल्याने हे खांबच डळमळीत होण्याचा धोका आहे. 

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP