'नाहीरें'साठी सोनियांची विधायक क्रांती
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्याची क्षमता असलेल्या या भागातील दुर्बल घटकांना जर योजनेबाहेर ठेवावे लागले, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था काय होईल, याची चिंता सत्ताधार्यांना लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री चव्हाण यांनी दीड कोटी जणांना अन्न सुरक्षा कवच देण्यासंदर्भात मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीने आढावा घेऊन निर्णयाप्रत येण्यास किमान दोन महिन्यांचा अवधी लागेल.


