महिलांनो, व्हावे स्वातंत्र्यासाठी दुर्गा!
स्थानिक स्वराज्य
संस्थांमध्ये ज्याप्रमाणे महिलांना ५0 टक्के आरक्षण दिले, त्याचप्रमाणे
विधिमंडळे व संसदेतही दिले पाहिजे. उत्तर प्रदेशातील दुर्गाशक्तींच्या मागे
जशी सर्वांनी शक्ती उभी केली, तशी शक्ती सर्व महिलांच्या मागे उभी केली
पाहिजे. स्वातंत्र्यानंतर ६५-६६ वर्षांनीदेखील महिलांचा आवाज बुलंद होऊ शकत
नाही, ही विषमता दूर करण्यासाठी आता महिलांनीच संघटितपणे दुर्गा बनून उभे
राहिले पाहिजे.
