दादांच्या ‘दादागिरी’ला तोड नाही. विधानसभेत आपण आहोत तसेच राहणार, हे सांगण्याची हिंमत दादांनी दाखवली, असे प्रशंसोद्गार अनेकांनी काढले. पण विधान परिषदेत निराळेच घडले. दादांच्या या दादागिरीवर कुरघोडी झाल्याचा अनुभव तेथील सदस्यांनी घेतला. मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा यांनी चक्क अजितदादांवर कुरघोडी केली.
अधिवेशनात दररोज एक घोटाळा काढणार असल्याची राणा भीमदेवी घोषणा करणा-या भाजपने अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी दुसरा घोटाळा काढला. अजितदादांनी ए. जी. र्मकटाइल्सचे 8 हजार 800 शेअर घेतले असून, कंत्राटेही मर्जीने दिल्याचा आरोप भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी केला. इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यमांनी ‘दादा घोटाळा’ अशा शीर्षकाखाली आधीपासूनच वृत्ते सुरू केली होती. त्यावर अजितदादांनी ‘दादागिरी स्टाइल’ने खुलासा केला. दादा म्हणाले, ‘‘मी दादा आहे. मला सगळे दादागिरी करतो म्हणतात. पण मी कायदा मोडत नाही, जे काम करतो ते कायद्यानुसार करतो, राज्याचे नुकसान होईल, असे काही करत नाही. माझ्या मतदारसंघातील जनता मला निवडून देते. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी काम करत राहीन. मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही.’’
एवढय़ावरच दादा थांबले नाहीत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची एकसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केल्याची घोषणा केली आणि तुम्हीच चौकशी करा, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांकडे मोर्चा वळवला. पवार कुटुंबावर माध्यमांचे प्रेम उफाळून आले आहे. माझ्या मालमत्तेचे चित्रीकरण चालू आहे. त्यांना चोवीस तास बातम्या द्याव्या लागतात. टीआरपी वाढविण्यासाठी हे चालवावे लागते, असे टोमणे त्यांनी मारले. माझे वागणे -बोलणे आहे तसेच राहील, असे सांगून घोटाळय़ाचे आरोप आणि त्यांची वृत्ते प्रसारित झाली तरी, ‘दादागिरी’ कायम राहील, असेच अजितदादांना सुचवायचे होते. हे सांगताना त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे कुटुंबीयांनी नाममात्र दराने घेतलेल्या भूखंडाचे प्रकरणही सभागृहात आणले आणि शिवसेनाही भूखंड घोटाळय़ात असल्याचा गौप्यस्फोट केला.
दादांच्या ‘दादागिरी’ला तोड नाही. विधानसभेत आपण आहोत तसेच राहणार, हे सांगण्याची हिंमत दादांनी दाखवली, असे प्रशंसोद्गार अनेकांनी काढले. पण विधान परिषदेत निराळेच घडले. दादांच्या या दादागिरीवर कुरघोडी झाल्याचा अनुभव तेथील सदस्यांनी घेतला. मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा यांनी चक्क अजितदादांवर कुरघोडी केली. जलसंपत्ती नियमन विधेयकावर अजितदादा ठाम होते. पिण्याचे पाणी, उद्योग आणि शेती हा क्रम योग्य आहे, असे त्यांचे मत होते. पण आमदारांनी विरोध केल्यामुळे अजितदादांचे मन वळवणे आवश्यक होते. हे अवघड काम मुख्यमंत्र्यांनी फत्ते केले. दादांशी सहमती घडवून पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम बदलण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले. 50 वर्षापूर्वी झालेल्या या कायद्यात बदल केल्याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. ज्या निर्णयाकडे राज्यातला शेतकरी डोळे लावून बसला होता, तो झाल्याबद्दल दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मात्र हळूच दादांची बाजू लावून धरली. उद्योग दुस-या क्रमांकावर असला तरी, आतापर्यंत सरकारने शेतीलाच प्राधान्य दिल्याचा दावा त्यांनी केला. शेतीला प्राधान्याने पाणी मिळावे यासाठी दिवसभर काथ्याकूट करणा-यांनी तटकरेंच्या या बोलण्याला आक्षेप घेतला नाही, हेही विशेषच.
0 comments:
Post a Comment